जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर विनोद पाटील) । जिल्हा परिषद जळगाव स्तरावरील पाच टक्के सेसफंडातून ग्रामीण भागातील दिव्यांग महिला व पुरुषांसाठी स्वयंरोजगारसाठी मंजुरी पत्र वाटप करण्यात आले.ग्रामीण भागातील दिव्यांगांना 5% सेस फंडातून दिव्यांगांना स्वयम रोजगारांसाठी पन्नास हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे.
दिव्यांग कक्ष अधिकारी श्री राजेश इंगळे, पंचायत समिती अधिकारी,विस्तार अधिकारी कैलास पाटील ,भाऊसाहेब पाटील तसेच अपंग तालुकाध्यक्ष श्री. संजय पाटील बुलंद पोलीस टाइम्स चे पत्रकार विनोद विठ्ठल पाटील यांच्या हस्ते नुकताच महिला व पुरुष यांना मंजुरी पत्रक देण्यात आले.
एकूण लाभार्थी संख्या 103 लाभार्थी होते. त्यापैकी 20 लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्यात आले. प्रथम कर्णदोष, अल्पदृष्टी व मूकबधिर या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रक देण्यात आले. उर्वरित लाभार्थ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले. यावेळी दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.







