कल्याणच्या कोळसेवाडीत भांडी खरेदीवरून मराठी ग्राहक आणि परप्रांतीय दुकानदार आमनेसामने

crime
File Photo

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । कल्याणच्या कोळसेवाडीत भांडी खरेदीवरून वाद उफाळून आला आहे. अजय स्टील या दुकानात भांडी खरेदीवरून हा वाद निर्माण झालाय. यात मराठी ग्राहक आणि परप्रांतीय दुकानदार आमनेसामने आले असून शाब्दिक वाद थेट मारहाणी पर्यंत गेल्याचा दावा करण्यात आलाय.

भांड्यांचा दर महाग असल्याने ग्राहक बाहेर पडताच अपशब्द व मारहाणीचा प्रयत्न झाल्याचा आरोप ग्राहक महिलेकडून करण्यात आला आहे. दरम्यान सुमारे दीड तास महिलांचा गोंधळ चाललाय. मात्र दुकानदारांनी हे सर्व आरोप फेटाळले असून स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीनंतर हा तणाव शांत झाला.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here