मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष आणि आझाद समाज पार्टी यांच्याकडून निवेदन

गिरीश महाजन

ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) । राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष व आझाद समाज पार्टी आणि समस्त आंबेडकर समाज यांच्या वतीने नाशिक येथील पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता आपले भाषण संपवले ही बाब लक्षात येतात इथे कार्यरत असलेल्या माधवी जाधव यांनी ही बाब लक्षात आणली आणि गिरीश महाजन यांना जाब विचारला गोष्ट वरिष्ठांच्या लक्षात येतात माधवी जाधव यांना वाडा पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले

राज्यात लाडकी बहीण योजना फक्त नावालाच आहे का हा प्रश्न ठाण्यातील पॅंथर साईनाथ खरात त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील नेते व युवक यांनी आज पत्रकारांची संवाद साधताना गिरीश महाजन यांना विचारला गिरीश महाजन यांनी संपूर्ण देशाची माफी मागून आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळेस ठाण्यात आंबेडकरी अनुयायी यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here