यशवंत चव्हाण सीबीडी बेलापूर.
शाहरुख खान,सलमान खान,आमिर खान ,सैफ अलि खान हे आपल्या देशातील रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत
आहेत.आपले मूर्ख रसिक प्रेक्षक प्रसंगी भीक मागतील,उधार घेतील,उपाशी राहतील पण यांचे चित्रपट पाहून त्यांना कोट्यवधींची कमाई करून देतील.त्यांच्या दर्शनासाठी झुंबड करतील.घरात कोणाचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देणार नाहीत पण ह्या नटांना शुभेच्छा देण्यासाठी रात्रभर त्यांच्या बंगल्याजवळ ठिय्या देऊन बसतील.एवढं अतोनात प्रेम करणारा चाहता वर्ग असताना हे खान कंपनी देशाची अवहेलना करतात.शाहरुख खान देशासाठी अथवा गोरगरिबांसाठी स्वतःच्या कमाईतून काही खर्च करत नाही.स्टेडियमवर गरीब सेक्युरिटी गार्डला मारहाण करतो.अमेरिकेत त्याला नग्न करून तपासणी केली जाते तरी वारंवार अमेरिकेत जाऊन देशाची नाचक्की करतो.पाकिस्तान ला कोट्यवधींची मदत करतो.सलमान खान काळवीट प्रकरणात दोषी,रस्त्यावर झोपलेल्या गरीब मजुरांना गाडीखाली चिरडतो बॉलिवूड मध्ये सर्वाना धाकात ठेवून कित्येकांचे करिअर बरबाद करतो.भर रस्त्यात मारामाऱ्या करतो.बेफाम दारू पितो तरी तो रसिकांचाच नव्हे तर उच्चभ्रू राजकारण्यांचा सुद्धा लाडका,त्याच्यासाठी लाल गालिचा अंथरला जातो.पतंग उडवले जातात.बॉलिवूडमध्ये आत्महत्या,खून यांचे संशयित वारे वाहू लागलेत आणि हे फार धोकादायक आहे वेळीच बंदोबस्त केला नाही तर ग्यांगवार सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते.सैफ अली खान सिनेमात आदर्शाचा पाठ देतो आणि प्रत्यक्ष जीवनात वयाने मोठी व निम्म्या वयाच्या नटीशी लग्न करून हा वासनाधुंद नट समाजात कोणता संदेश देतो कि,त्याला सरकार ‘पद्मश्री” बहाल करते.हा एकप्रकारे ज्या निष्ठावंत मान्यवरांना पुरस्कार मिळाला त्यांची अवहेलनाच केली असे वाटते.भविष्यात सरकारने प्रतिष्ठित पदे देताना सरकारची अप्रतिष्ठा होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आमिर खान हे नटसम्राटच आहेत.त्यांच्या चित्रपटाने देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा अटकेपार झेंडा रोवला असे त्यांचे विचार व दिशा देणारे भारदस्त चित्रपट पाहून रसिक प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले अमाप प्रसिद्धी धनदौलत मिळाली त्याचे ते हक्कदार सुद्धा आहेत.त्यांची सत्यमेव जयते, पाणी फाउंडेशन हे अतुलनीय कार्य पाहता त्याच्याबद्धल अत्युच्च आदर वाटत होता.तेच आमिर खान याना देशात काही अप्रिय घटना घडल्या आणि अचानक भारत देश राहण्यालायक नाही असे वाटू लागले.देश सोडण्याची भाषा होऊ लागली.जगात देशाची प्रतिमा मालिन करण्याचा प्रयत्न केला. हा एक प्रकारे देशद्रोहच म्हणावा लागेल,आतापर्यंत देशात जे काही त्यांनी सर्व माध्यमातून जी देशवासीयांची आपुलकी प्रेम मिळवले ते फक्त वैयक्तीत आर्थिक स्वार्थासाठीच होते.जनतेच्या जीवावर शेकडो कोटींची माया जमवायची व पाच पंचवीस लाख खर्च करून उदारतेच प्रदर्शन करायचं हा ह्यांचा गोरखधंदा अव्याहतपणे सुरु आहे.जनतेच्या भावनेशी विचारांशी प्रेमाची अवहेलनाच केली.स्वातंत्र्यकाळापासूनच आपला शत्रू पाकिस्तान यांच्याशी आपुलकीचे संबंध ठेवले.भारताविरोधात भाष्य करणार्या,अंतर्गत ढवळाढवळ करणाऱ्या,काश्मीर प्रश्नावर टोकाची भाषा करून जवानांना वीरमरण देणाऱ्या पाकिस्तान ह्या देशाला तुर्कस्तान सतत पाठिंबा व मदत करत आला आहे.आमिर खान हा त्या तुर्कस्तानच्या पहिल्या महिला नेत्या एमीन
ऐद्रोगन ह्यांना भेटतो.भारताच्या सतत विरोधात उभा राहणारा देशाच्या नेत्याला आमिर खान कोणाच्या परवानगीने भेटतो त्या मागचे उद्दिष्ट काय ?हा पराकोटीचा धर्माभिमान उफाळून तर आलेला नाही ना ?जावेद अख्तर नेहमी पाकिस्तानला कार्यक्रमानिमित्त जातात त्यांच्यासमोर भारताची निर्भत्सना केली जाते पण जावेद यांनी त्याला कधी मुह तोड जबाब दिल्याचे ऐकिवात नाही असे का ? तेच एका पाकिस्तानी कार्यक्रमात सुनील गावस्कर यांनी रोखठोकपणे भारताची आन बान शान म्हणून गानसम्राद्नी लतादीदी यांचा अभिमानाने गौरवलेख करून मी देशभक्त हिंदुस्थानी आहे असे अभिमानाने सांगितले.ह्याला म्हणतात परदेशात जाऊन छातीठोकपणे देशाची डंका पिटणे.हा देशाभिमान ह्या खान मंडळींकडे का नाही ?सलीम जावेद यांनी जबरदस्त हिट चित्रपट लिहिले त्या चित्रपटात बारकाईने पहिले तर लक्षात न येणारे धर्मांधतेची पेरणी केल्याचं जाणवते.ओरबाडायचं इथे वाटायचे तिथे वर देशाची अब्रू घालवायची अश्या नट मंडळींच्या सिनेमावर त्यांच्या कार्यक्रमावर देशभक्त जनतेने कायमचा बहिष्कार टाकुन त्याना वठणीवर आणले पाहिजे.कोणत्याही धर्माबद्धल अजिबात आकस नसलेले देशभक्त मिसाईल मॅन आदरणीय,वंदनीय दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेब ह्यांना नजरेसमोर धरून देशाभिमान जागृत ठेवावा हीच देशवासियांची अपेक्षा.
Sr.Citizen.mo.9920776277







