नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी विजय पाटील) – गणेशोत्सवाच्या काळात सर्वांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.कारण प्रशासन म्हणून आम्ही सुविधा वाढवू शकतो परंतु covid-19 च्या लढ्यासाठी सर्वांनी स्वयंशिस्त लावून घेणे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे हाच एकप्रभावी उपाय आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचत वाढ होत असून उत्सवाच्या काळात सोशल डिस्टंसिंग चे पालन करणे तसेच मास्को सॅनिटायझर चा योग्य वापर जेणेकरून उत्सव साजरा करताना कुठली बाधा येऊ नये . प्रशासनाकडून आवश्यक असे सर्व प्रयत्न केले जात आहे .परंतु नागरिकांनी देखील स्वतः च्या आरोग्यासोबतच इतरांच्या आरोग्याचीही काळजी घेणे गरजेचे आहे.यासाठी सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असून नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे.यापुढील सर्व सण उत्सव साजरे करताना शासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.संपूर्ण जगाला या संकटापासून बाप्पा लवकर दूर करो अशी जिल्हाधिकारी यांनी श्रीगणेशा च्या चरणी प्रार्थना केली आहे.
Home उत्तर महाराष्ट्र नंदुरबार गणेशोत्सवाच्या काळात सर्वांनी विशेष काळजी घेण्याची गरज; जिल्हाधिकारी राजेंद्र भारूड यांचे...







