शिक्षण महर्षी ॲड. संभाजीबापू पगारे लोकसेवा पुरस्कार कैलास तानकर यांना प्रदान

लोकसेवा पुरस्कार

शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) । जिरे माळी समाजाचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त व मोटीव्हेशनल स्पीकर कैलास तानकर यांना त्यांच्या उत्कृष्ट समाजसेवा व मोटिव्हेशनल संगीत कार्याबद्दल त्यांना राज्यस्तरीय अॅड संभाजीराव पगारे लोक सेवा पुरस्कार नासिक येथे गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित कला साहित्य संमेलनात ट्रॉफी, सन्मान पत्र शाल बुके प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

नाशिक येथे नुकतेच गिरणा गौरव प्रतिष्ठान आयोजित अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन पंचवटी येथील भावबंधन मंगल कार्यालयातील शिक्षण महर्षी एड. संभाजीबापू पगारे साहित्य नगरीत दोन दिवस चाललेले संमेलन उत्साहात पार पडले. ह्या संमेलात काळाच्या ओघात लोप पावत चाललेल्या लोककला व लोकधारा, मराठी कविता, अहिराणी मायबोली रचना, गझल, लावण्या, पारंपारिक लोक नृत्यांचे उत्तम सादरीकरण करण्यात आले होते. विशेषतः ह्या संमेलनात राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांच्या पुस्तकांना निळूभाऊ फुले वांड:मय पुरस्कार तर कविता संग्रहाना स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार प्रदान करण्यात आलेत.
मानाचा शंकरराव बोऱ्हाडे पुरस्कार डॉ. चंदनशिवे यांना देऊन सन्मानित करण्यात आले, तर संमेलनाचे खास आकर्षण ठरलेला राज्यस्तरीय शिक्षण महर्षी अॅड. संभाजी बापू पगारे लोक सेवा पुरस्कार संगीत क्षेत्रातील गीनीज बुक ऑफ रेकार्ड ,दोन वर्ल्ड रेकॉर्डस सह आयफा अवार्ड बॉलीवूड मुंबई प्राप्त असलेले नागपूर येथील सेवा निवृत सह पोलीस आयुक्त कैलास तानकर यांना शॉल श्रीफळ बुके फोटोफ्रेम सन्मान पत्र सोबत अप्रतिम ट्रॉफी देऊन महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती पुष्पलता पगारे यांच्या हस्ते सन्मानाने प्रदान करण्यात आला.
यावेळी संमेलनाच्या अध्यक्षा अलकाताई दराडे, लावणी सम्राज्ञी रेश्मा परितेकर,लेखक सुरेश पवार,संमेलाच्या स्वागताध्यक्ष सुनंदाताई पाटील, प्रमुख पाहूणे वसंतराव खैरनार, गावगाडाकार साहेबराव नंदन व विविध मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.कैलास तानकर हे माळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष असून सगर समाज भूषण आहेत. त्यांनी आत्तापर्यंत शेकडो मोटीवेशनल शो च्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
लोकरंजनातून लोक शिक्षण व मनोरंजनातून समाज प्रबोधन करण्यात त्यांचा हातखंडा आहे. पाच हजार गाणी तोंडपाठ आहेत. योग्य व्यक्ति योग्य निवड झाल्याचे गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी कौतुक केले आहे. कैलास तानकर यांना लोकसेवा संभाजी बापू पगारे हा प्रतिष्ठेचा मानाचा पुरस्कार मिळाल्या बद्दल सिने, नाट्य, संगित क्षेत्रातून कौतुक होत आहे. ह्या पुरस्कार सोहळ्यास राज्यभरातून हजारो साहित्यिक रसिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here