सातारा (उपसंपादक लव चव्हाण) । संत बाळूमामा यांचा गणेशवाडी येथे सध्या मुक्काम असून. गेली आठवडाभर गणेशवाडी गावात भक्तीमय असे वातावरण निर्माण झालेले आहे सुमारे आठवडाभरापूर्वी संत बाळूमामा यांचे गणेशवाडी गावात आगमन झालेले असून आगमनादिवशी सकाळी गावात आगमन होताच ग्रामस्थांनी भजन-कीर्तन, टाळ-मृदंगांच्या गजरात व फुलांच्या वर्षावात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
या आठदिवसाच्या मुक्कामादरम्यान संत बाळूमामांच्या कार्यक्रम स्थळी दररोज सकाळ संध्याकाळ आरती, महाप्रसाद व दररोज रात्री ओव्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. संत बाळूमामा मंदिर परिसरात भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
या कार्यक्रमासाठी महिला-भक्त, युवक वर्ग, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य, मंदिर विश्वस्त मंडळ व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, भक्तिभावाच्या वातावरणात पार पडला जात आहे. संत बाळूमामा यांच्या मुक्कामामुळे गावात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे








