सातारा जिल्ह्यातील गणेशवाडीत पाच लाखांची चोरी

चोरी

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) । गणेशवाडी (वडूज) ता. खटाव येथे राहत्या घराचे कुलूप काढून अज्ञात चोरट्यांनी सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.

याबाबतची वृत्त असे गणेशवाडी येथे वैभव विलास बुरुंगले यांचे राहते घर आहे. गुरुवारी रात्री आठच्या सुमारास वैभव हे ट्रक व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. तर त्यांच्या पत्नी व मुले गावातील संत बाळू मामांच्या मंदिरात प्रसादासाठी गेले होते. त्यावेळी रस्त्यावर लावलेल्या वाहनांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराबाहेर ठेवलेली चावी घेऊन कुलूप काढून घरात प्रवेश केला.
त्यानंतर घरात घुसून चोरट्यांनी कपाटाचे लॉकर काढून गंठण, कर्णफुले, अंगठी, दोन नथी असे चार तोळे सोने तसेच २० हजार रुपयांची रोकड पळवून नेली असून. याबाबत सौ. रेखा वैभव बुरुंगले यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here