सातारा शहरातील शनिवार पेठ तेली खड्डा येथील जुगार अड्ड्यावर छापा

जुगाराचा अड्डा

सातारा (उपसंपादक अरुण मोरे) | शहरातील शनिवार पेठ तेली खड्डा या ठिकाणी एका टपरीच्या आडोशाला सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून एकूण आठशे रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त केली आहे.

याप्रकरणी रमेश रामचंद्र माने ( वय ३५ रा. साबळेवाडी ता. सातारा), यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हवालदार विक्रम माने करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here