आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर; रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार शशिकांत शिंदे

सातारा (उपसंपादक लव चव्हाण) | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते, आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सातारा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस श्री. नितीनदादा शिंदे यांच्या मित्र समूहातर्फे तसेच सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. सनी आवळे यांच्या पुढाकाराने हे शिबिर संपन्न झाले. या सामाजिक उपक्रमास युवक, कार्यकर्ते व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

 

सदरबझार येथील निर्मल हॉलमध्ये “चला रक्तदान करूया, मानवतेची सेवा करूया” या सामाजिक संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. सध्या रुग्णालयांमध्ये जाणवणारा रक्ताचा तुटवडा लक्षात घेता, वाढदिवसाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च टाळून अशा प्रकारे समाजोपयोगी उपक्रम राबवणे अत्यंत कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

या शिबिरात अनेक तरुणांनी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नितीनदादा शिंदे मित्र समूह तसेच सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिरात रक्त संकलनाचे काम ‘अक्षय ब्लड सेंटर, सातारा’ यांच्या वैद्यकीय पथकाने केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here