नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) । मंगळवार दि २० जानेवारी २०२६ रोजी मौजे दहिवड ता देवळा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय दहीवडकर यांनी दहिवड ते देवळा शहर तसेच सर्व शासकीय कार्यालये व तहसील कार्यालयात पायी प्रवास करत लक्षवेधी भिकमांगो आंदोलन*आंदोलन करून तालुक्यातील जनतेच तसेच लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.
खेड्यापाड्यातील नवयुवकांचे शरीर सौष्ठव,सक्षम व निरोगी राहणेसाठी दहीवड गावात आधुनिक शास्त्रीय व्यायाम शाळा व्हावी. यासाठी संजय दहीवडकर यांनी अनेक वेळा निवेदन देऊनही त्यांच्या मागणीची प्रशासनाने दखल न घेतल्याने मंगळवारी दुपारी अंगावर फाटके कपडे घालून हातात कटोरा घेऊन भिक मांगो आंदोलन केले.
ग्रामपंचायत दहीवड, तहसील कार्यालयात तसेच पंचायत समिती,व इतर शासकीय यंत्रणा, स्थानिक लोकप्रतिनिधी कडून काहीही कार्यवाही होत नसल्याने प्रतिकात्मक आंदोलन करण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी सांगितले, ग्रामविकास समिती दहिवडचे अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी दहिवड गावापासून धोबीघाट थेट शासकीयव तसेच प्रशासकीय कार्यालयात तसेच देवळा व शहरात पायी पदयात्रा काढत प्रतिकात्मक भिक मागून आंदोलन केले असता मिळालेली ८०२ रूपयाची तुटपुंजी भीक शासनापर्यंत पोहोच व्हावी म्हणून चांदवड देवळा मतदार संघाचे आमदार डॉ.राहूलदादा आहेर यांच्या देवळा येथील निवासस्थानी पोहोच केली. याकामी रामनगर दहीवड येथील नवयुवक प्रविण सुदाम अहिरराव, युवराज रमेश देवरे, यांनी मोलाचे सहकार्य केले.







