सॅटॅलाइट लॉन्चड बाय इस्रो – या पोस्टर प्रदर्शनास उस्फूर्त प्रतिसाद

सॅटॅलाइट लॉन्चड बाय इस्रो

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । सॅटॅलाइट लॉन्चड बाय इस्रो याचे मोठ्या प्रमाणावर पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आले होते त्यात आदित्य L1,चंद्रयान -3,IMS -1, रोहिणी RS-1 , जीसॅट 14,X-PO – SAT, Mars Orbitor Misson,, NVS- 01 satellite, Megha-TropIques Mission SLV -3, electromagnetic intelligence satellite, अशा विविध इसरो ने पाठवलेल्या सॅटॅलाइट बद्दल मोठ्या प्रमाणावर पोस्टर प्रदर्शन बनवण्यात आले होते.

पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटन सोयो सिस्टिमचे प्रोपोएटर किशोर ढाके यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल .पी. देशमुख, उप प्राचार्य डॉ.के बी पाटील डॉ.माधुरी पाटील, कार्यक्रमाचे आयोजक भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर .बी .देशमुख, परीक्षक म्हणून मराठी विज्ञान परिषदेचे प्रा. दिलीप भारंबे, इलेक्ट्रोसॉफ्ट कंपनीचे श्री राजेश ठाकरे व श्री निलेश वाघ ज्यांनी रोबोटचे बनवण्याचे तंत्रज्ञान ची माहिती दिली पोस्टर प्रदर्शनात 55 , विद्यार्थी विद्यार्थिनींनी भाग घेतला होता.
अंडरग्रॅज्युएट विभागात रेवेश रामेश्वर खराटे, याने प्रथम क्रमांक पटकावला , द्वितीय क्रमांक निंबेश कमाल बारेला पटकावला, त्रिवेणी हेमंत पाटील ,मुनिरा एम शेख, तडवी तनुजा कसम, दिव्या सचिन पाटील यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आली तर पोस्ट ग्रॅज्युएट गटातून बाविस्कर प्रीती जगजीवन हिला प्रथम पारितोषिक मिळाले तर विद्यार्थी पाटील जयेश गुलाबराव याला द्वितीय पारितोषिक मिळाले , कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. हर्षल गंगावणे, प्रा. विशाल तेली सर , प्रा. पानी सर , श्री राम पाटील, श्री राजू सोनवणे, श्री राजू पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

सॅटॅलाइट लॉन्चड बाय इस्रो

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here