खेड भाळवणी येथे शोकसभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली

अजितदादा पवार

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) । पंढरपूर तालुक्यातील खेडभाळवणी येथे सर्वपक्षीय व ग्रामस्थांच्या वतीने गुरुवार (दि.२९) सकाळी १० वाजता सोमेश्वर मंदिर येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार, सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून काम करणारा एक धाडसी नेता. आपणा सर्वांना सोडून गेल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या.
प्रशासनावर, मजबूत पकड असणारा असा हा नेता होता. संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून. अजितदादा पवार यांच्या जाण्याने सर्व.च क्षेत्रातील फार मोठे नुकसान झाले आहे. असा नेता पुन्हा होणे नाही अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या. पवार कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो अशी प्रार्थना पांडुरंग चरणी करण्यात आली. यावेळी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here