जामनेर तालुक्यात विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

crime
File Photo

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर तेजस भंगाळे) । जामनेर पोलीस ठाण्यात विवाहित महिलेवर शारीरिक व मानसिक अत्याचार केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ३४/२०२६ नुसार भारतीय दंड विधान कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही नोंद २८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.०२ वाजता करण्यात आली आहे.
फिर्यादी महिला (वय ३६, व्यवसाय – घरकाम) रा. लोहारा, ता. पाचोरा (सध्या रा. सावरला, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ४ ऑक्टोबर २०२५ पासून वेळोवेळी आरोपींनी संगनमताने त्यांना शिवीगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली तसेच शारीरिक व मानसिक त्रास देत गांजपाठ केला. यावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपींमध्ये पती, सासरे, सासू व नणंद यांचा समावेश आहे. सदर प्रकार फिर्यादीच्या सासरी लोहारा (ता. पाचोरा) तसेच माहेरी सारगाव (ता. जामनेर) येथे घडल्याचे नमूद करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड हे करीत असून, सध्या कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here