पळून जाण्यासाठी आरोपीची पोलिस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरून उडी

पोलिस स्टेशन

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) । विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका सराईत आरोपीला पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई सचिन पवार यांनी फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका गुन्ह्यात तपासासाठी विश्रांतवाडी पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास साहिल सादिक शेख (वय २१, रा. लोहगाव) याला ताब्यात घेतले होते. पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावरील कक्षात त्याला ठेवण्यात आले असताना, त्याने आपल्याला उलट्या होत असल्याचे नाटक केले. यावेळी सोबत असलेल्या पोलीस शिपाई पवार यांचा हात झटकून त्याने थेट पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारली आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलीस शिपाई सचिन पवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगावधान राखले आणि पाठलाग करून शेखला पुन्हा ताब्यात घेतले.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुगडे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here