लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणाला भररस्त्यात लुटले

crime
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) । पुणे स्टेशनला सोडू असे सांगून मोटार चालक आणि साथीदारांनी तरुणाला लुटल्याची घटना नगर रस्ता परिसरात घडली. या प्रकरणी मोटार चालकासह त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने येरवड्यातील लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मोटार चालकासह त्याच्याबरोबर असलेल्या चार साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण सोमवार पेठेतील नरपरतगिरी चौकात राहायला आहे. ३० जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास नगर रस्ता परिसरात स्टेशनकडे जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत थांबला होता. त्या वेळी मोटार चालक आणि साथीदार मोटारीतून तेथे आले. आरोपींनी तरुणाला पुणे स्टेशनपयर्यंत सोडतो, अशी बतावणी केली. त्यानंतर तरुणाला मोटार चालक आणि साथीदारांनी मारहाण केली. त्याला नगर रस्ता, बंडगार्डन रस्ता परिसरातून नेण्यात आले.
तरुणाला जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपींनी त्याच्याकडून ऑनलाइन पद्धतीने १८ हजार रुपये घेतले. तरुणाला रस्त्यात सोडून आरोपी मोटार चालक साथीदारांसह पसार झाला. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here