पुण्यात २५ हजारांची लाच मागणारा पोलीस हवालदार जेरबंद

bribe-to-police
File Photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) । एका तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदाराविरुद्ध एका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या तक्रारीच्या चौकशीत मदत करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी संबंधित पोलीस हवालदाराने तक्रारदाराकडे पैशांची मागणी केली होती. सुरुवातीला ही रक्कम मोठी होती, मात्र तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले.
तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी तत्काळ पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाची पडताळणी केली.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात, संबंधित हवालदाराने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. पुराव्यांच्या आधारे एसीबीने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि शासकीय कामात पारदर्शकता आणण्यासाठी एसीबीकडून अशा प्रकारच्या कारवाया तीव्र करण्यात आल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here