गोंदिया (प्रतिनिधी) । जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्राला खळबळजनक घटना समोर आली आहे. देवदूत मानल्या जाणाऱ्या डॉक्टरने उपचाराच्या बहाण्याने अवघ्या १० दिवसांच्या चिमुकलीची विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या डॉक्टरने १० दिवसांच्या चिमुकलीची तब्बल 3 लाख रुपयांत विक्री केली असून, या प्रकरणी मुख्य सूत्रधार डॉ. नितेश बाजपेयी यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.







