अळकुटी पतसंस्था परिवाराच्यावतीने सोनाबाई पोखर्णा राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्काराने सन्मानित

सोनाबाई पोखर्णा

पारनेर (उपसंपादक दिपक वरखडे) | पारनेर तालुका प्रतिनिधी विनायक भरत फापाळे – अळकुटी येथील ज्येष्ठ व्यक्ती महत्व व आळेफाटा येथील पोखर्णा उद्योग समुहाच्या माता श्रीमती सोनाबाई अंबरचंद पोखर्णा यांना अळकुटी पतसंस्था परिवाराच्या वतीने ” राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार ” हा मानाचा सन्मान देऊन सन्माननित करण्यात आले .

अळकुटी चे दिवंगत सरपंच भास्करराव शिरोळे यांनी स्थापन केलेल्या व राज्यात प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव रोठा येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष महेश शिरोळे यांच्या नेतृत्वाखालील अळकुटी पतसंस्था परिवाराच्या वतीने समाजातील नामवंत , यशवंत व किर्तीवान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला .
अळकुटी येथील ज्येष्ठ व्यक्ती महत्त्व व आळेफाटा येथील पोखर्णा उदयोग समुहाच्या माता श्रीमती सोनाबाई अंबरचंद पोखर्णा यांनी पोखर्णा परिवाराला दिलेले संस्कार , त्यांनी सोसलेले कष्ट व समाजा मध्ये एक आदर्श घडवण्यासाठी केलेले योगदान हे अत्यंत मोलाचे असून राजमाता जिजाऊंच्या विचारांचा वारसा जपत , त्यांनी कर्तृत्वाने एक आदर्श माता म्हणून माता पोखर्णा यांनी स्वत : ला सिद्ध केले , त्यातून त्यांचे कार्य येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहणार आहे , म्हणून त्यासाठी त्याग , चिकाटी व संस्कारमय प्रवासाचा गौरव करण्यासाठी पारनेर तालुक्यात सामाजिक क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या अळकुटी पतसंस्था परिवाराच्या वतीने महिला शिवजयंती महोत्सवाच्या निमित्ताने अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा राज्यस्तरीय ” आदर्श माता जिजाऊ माता पुरस्कार २०२६ ” ग्रामविकास मंत्रालयाचे कक्ष अधिकारी अनघा ढवळे , चौधरी , यशस्वी उद्योजिका सौ . श्रद्धा ढवण यांच्या हस्ते व अळकुटी पतसंस्था परिवाराचे प्रमुख महेश शिरोळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख मान्यवर आणि ग्रामस्थांच्या सन्मान पूर्वक देण्यात आला . याप्रसंगी उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला , त्याचे ही विजेत्यांना बक्षीसे देण्यात आले. यावेळी पोखर्णा उद्योग समुहाचे अध्यक्ष महावीर पोखर्णा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . सुत्रसंचालन होम मिनिस्टर फेम , सुप्रसिद्ध निवेदक गणेश पाडेकर यांनी केले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here