कळवण येथे प्रांत कार्यालयाच्या पायरीवर शेतक-यांचे ठिय्या आंदोलन

शेतक-यांचे

नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) । अवकाळी पावसाच्या माऱ्याने व सरकारच्या चुकीच्या धोरणाने महाराष्ट्रातला शेतकरी पूर्ण मेटाकुटीस आलेला आहे. वर सरकारी धोरण शेतकऱ्यांना मारक ठरत आहे. जगाचा पोशिंदा आज मरणाच्या दारात उभा आहे. शासनामार्फत २४०० रुपये क्विंटल या हमीभावाने मका खरेदी केली खरी परंतु ती पुरेशी नाही,ती तुटपुंजी आहे, तीही खरेदी काही दिवसातच बंद पडली आहे

बाजार समितीमध्ये मक्याचे बाजार भाव १४००/१५०० रुपये क्विंटल पर्यंत खाली आले आहेत. शासनाने एक तर सर्रास २४०० रुपये किंमतीने सर्व शेतकऱ्यांचा मका खरेदी करावा. किंवा जो बाजार समितीमध्ये १४०० ते १५०० रुपये मका जात आहे त्याला८००रु, अनुदान देऊन शेतकऱ्यांना आधार द्यावा. तसेच उन्हाळी कांद्याचे बाजार भाव सुद्धा आज ८०० ते ९००रुपये क्विंटल पर्यंत खाली आले आहेत.
या बाजारभावानुसार आजच्या घडीला निम्मा खर्च सुद्धा कांद्याचा निघत नाही अशी परिस्थिती आहे. कांद्याला कमीत कमी ३ हजार रुपये क्विंटल हमीभाव शासनाने जाहीर करावा. तसेच शेतकऱ्यांची लवकरात लवकर कर्जमाफी करून रेगुलर व थकीत शेतकऱ्यांना समान न्याय देण्यात यावा. येत्या तीन दिवसात सर्व मागण्या मान्य न झाल्यास कळवण कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने कळवण प्रांत कार्यालयासमोर जाहीर उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबतचे निवेदन तहसिलदार कळवण, पोलिस निरीक्षक, कळवण, सभापती बाजार समिती, कळवण यांना देण्यात आले आहे, निवेदनावर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौदळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते कुबेर जाधव, कळवण तालुका शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामक्रुष्ण जाधव, योगेश पवार, संदिप शिंदे, संदिप पवार, शशीकांत शिंदे, काशिनाथ गुंजाळ, योगेश शिंदे, दिपक पवार, रामा पाटील,बाळु शिंदे, बापु वाघ, प्रमोद शिंदे, अनिल रौंदळ, मनोहर रौदळ, आदी सह शेकडो मका आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here