आज आढळले ६०५ कोरोनाबाधित – ५०८ रुग्णांनी केली कोरोनावर मात
जळगाव (प्रतिनिधी) – कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आज संध्याकाळी प्राप्त झाल्यानंतर जिल्ह्यात आज ६०५ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार ३१८ झाली आहे. सर्वाधिक १०१ कोरोबाधित एरंडोल तालुक्यात आढळून आले आहेत. दिवसभरात ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, ५०८ कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
आज आढळलेल्या ६०५ रुग्णांमध्ये जळगाव शहर ९७, जळगाव ग्रामीण १३, भुसावळ ८, अमळनेर ८१, चोपडा ४६, पाचोरा ३६, भडगाव ४७, धरणगाव ५, यावल २८, एरंडोल १०१, जामनेर ३३, रावेर ६०, पारोळा ७, चाळीसगाव २९, मुक्ताईनगर १, बोदवड १०, इतर जिल्ह्यातील ३ असा समावेश आहे. दिवसभरात ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ तालुक्यातील ३, जळगाव शहर २ तर जळगाव ग्रामीण, अमळनेर, चोपडा, धरणगाव, एरंडोल आणि रावेर तालुक्यातील प्रत्येकी १ याप्रमाणे कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.







