नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | जिल्ह्यातील कळवण तालुक्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे, या ज्वलंत प्रश्नांवर लक्षवेधी उपोषण आंदोलन कळवण बाजार समिती आवारात सुरू झालं असून, कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावतीने सर्व शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होत आमरण उपोषणाला शेतकरी बसले आहेत,
कांदा, मका, सोयाबीन यांसारख्या शेतीमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना बाजारात मिळणारा दर मात्र अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या गंभीर परिस्थिती संदर्भात शाशनाचे लक्ष वेधून,आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांनी कळवण येथे अमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांपासून शेतीमालाच्या दरांमध्ये मोठी घसरण होत आहेत. विशेषतः कांद्याच्या दरांमध्ये झालेली मोठी घसरण, मक्या सह सोयाबीनला मिळणारा अत्यल्प बाजारभाव यामुळे शेतकरी हतबल होऊन मेटाकुटीला आले आहेत. शेतीसाठी लागणारे बियाणे, खते, औषधे, मजुरी व इतर खर्च दाम दुप्पट झाले आहेत, असं असतानाही शेती माल उत्पादनाला योग्य व किफायतशीर किंमत मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे, कर्ज बाजारी झालेला बळिराजाला कर्ज माफीची प्रतिक्षा आहे, थकित कर्जाच्या खाईत दबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ही भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी लावून धरली जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ते कुबेर जाधव यांनी सांगितले,
या सर्व पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील शेतकरी एकत्र येत शांततामय मार्गाने उपोषण आंदोलन करून शासनाने लक्ष वेधून घेत आहेत,. आपल्या रास्त मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात आणि शेतमालाला हमीभाव,व कर्जमुक्ती मिळावी या उद्देशाने कळवण भेंडी येथील कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौदळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामक्रुष्ण जाधव, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, विसापूर येथील कांदा उत्पादक शेतकरी काशिनाथ गुंजाळ,देसराणे येथील शशि हिरे, मुन्ना पगार, गोरख अभा देवरे यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे, त्यांना पाठिंबा देण्यासाठी कांदा व मका उत्तपादक शेतकऱ्यांनी गर्दी केली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शांततेच्या मार्गाने उपोषण स्थळी उपस्थित राहावे व पाठिंबा जाहीर करून सहभागी व्हावे असे आवाहन उपोषण कर्ते कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौदंळ व इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.







