शालेय विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सायन्स टेक्नो क्विझ संपन्न

सायन्स टेक्नो क्विझ

जळगाव (प्रतिनिधी तेजस भंगाळे) । देवगिरी विज्ञान प्रतिष्ठान जिल्हा जळगाव आणि नूतन मराठा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी डॉक्टर विक्रम साराभाई स्पेस सायन्स टेक्नो क्विझ चे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल पी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

जळगाव शहरातील विविध शाळांचे साठ विद्यार्थी यात सहभागी होते सीनियर आणि ज्युनिअर अशा दोन गटांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली प्रथम द्वितीय आणि तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र सन्मानचिन्ह आणि रोग स्वरूपाची बक्षीसह महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान भारती जळगाव जिल्हा संयोजक डॉ. माधुरी पाटील, डॉक्टर के बी पाटील, आर बी देशमुख यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे परीक्षण विज्ञान भारती चे सदस्य श्री अमोघ जोशी यांनी केले. या क्वीजमध्ये विवेकानंद प्रतिष्ठान आणि सेंटी टेरेसाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here