नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण

पारितोषिक

पुणे (संपादक सुहास गायकवाड) | माणिकबाग येथील युनायटेड संबोधी ऑर्गनायझेशन ट्रस्ट आणि अखिल सिंहगड रोड फ्रेंड्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष सुहास गायकवाड यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले. एंजल डान्स ॲकॅडमी, रोड डान्स ॲकॅडमी, संस्कृती डान्स ॲकॅडमी, अनाहत स्कूल ऑफ डान्स या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले आणि पारितोषिक पटकावले.

 

लहान गटात वैष्णवी क्षीरसागर, विराली वडवेराव, दिव्या जंगले, संस्कृती जोरी, इशिका वरवड, आदींनी उत्तम नृत्याचे सादरीकरण केले. तर मोठ्या गटात घनश्याम सोनाने, रोहित पांडे, रोनक सिंध, हर्ष पवार, ऐश्वर्या गरड, रागिणी नादार आदी विद्यार्थ्यांनी उत्तम नृत्याचे सादरीकरण करून पारितोषिक पटकावले.

यावेळी नगरसेवक प्रसन्न जगताप, सचिन मोरे, ज्योती गोसावी, भाजपचे पदाधिकारी दीपक नागपुरे, निखिल मुंडे, महेंद्र वालदिया, बाळासाहेब पुकळे, राकेश राठोड, यशवंत कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास सहकार्य लाभल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, शरद झिने, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, आरोग्य विभागाचे सह आयुक्त विजयकुमार वाघमोडे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मंगलदास माने, आशिष सुपनार यांचा सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here