पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा घराघरांत प्रसार करण्यासाठी महावितरणचा पुढाकार

महावितरण

भोसरीतील मोशी महावितरण शाखेमार्फत जनजागृती मोहीम; लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती

पुणे (पुणे उपसंपादक प्रशांत महाजन) |  केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सर्वसामान्य नागरिकांच्या घराघरांत पोहचवण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. महावितरणच्या भोसरी विभागांतर्गत येणाऱ्या मोशी शाखेच्या वतीने या योजनेची माहिती देण्यासाठी नुकतीच विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली.

 

भोसरी परिसरातील संजय गांधी नगर, बोहाडेवाडी परिसर, बारणे वस्ती ३ आणि २३ स्टार निर्माण सोसायटी या ठिकाणी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी नागरिकांना योजनेचे स्वरूप, मिळणारे अनुदान आणि भविष्यात होणारी वीज बिलाची बचत याबद्दल सविस्तर माहिती देऊन प्रचार करण्यात आला.

या मोहिमेत महावितरणचे सहाय्यक अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश भगत, सहाय्यक अभियंता पुष्पेंद्र सिंह आणि सहाय्यक अभियंता सौ. विजया पवार यांनी स्वतः सहभागी होऊन नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. तसेच या भागातील महावितरणचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमाला स्थानिक लोकप्रतिनिधींनीही मोलाची साथ दिली. जनजागृतीसाठी या प्रभागातील नगरसेवक निखिल बोहाडे  प्रामुख्याने उपस्थित होते. नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपले घर ‘सौर ऊर्जेने’ प्रकाशमान करावे, असे आवाहन यावेळी महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here