गुन्हेगारांचे कर्दनकाळ सूरज पाटील ‘डीजी’ पदकाने सन्मानित; जळगाव जिल्हा पोलीस दलाचा गौरव

सूरज पाटील

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | आपल्या तपासाचे कौशल्य आणि खबऱ्यांच्या भक्कम नेटवर्कच्या जोरावर अनेक गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणणारे सुरज पाटील यांना महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

 

सूरज पाटील यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई पोलीस दलातून केली होती. २००७ साली ते बदलीने जळगाव जिल्हा पोलीस दलात रुजू झाले. गेल्या दोन दशकांपासून त्यांनी जिल्ह्यापेठ पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखा आणि सध्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भुसावळ येथे आपली सेवा बजावली आहे.

सूरज पाटील यांनी आजवर दरोडे, घरफोडी, जबरी चोरी, खून (मर्डर) आणि आर्थिक फसवणुकीचे असंख्य गुन्हे उघडकीस आणले आहेत. विशेषतः जनमानसावर विपरीत परिणाम करू शकणाऱ्या अनेक गोपनीय माहिती आपल्या नेटवर्कच्या जोरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांनी अनेक गंभीर अनर्थ टाळले आहेत. त्यांच्या याच अष्टपैलू कामगिरीची दखल घेत त्यांना राज्य पोलीस दलातील मानाचे ‘पोलीस महासंचालक पदक’ जाहीर झाले होते.

१ मे, महाराष्ट्र दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात सूरज पाटील यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते. सूरज पाटील यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल संपूर्ण जिल्हा पोलीस दलातून आणि नागरिकांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या पदकामुळे जळगाव पोलीस दलाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here