न्याहळोद केंद्रात ‘नूतन विद्यालय’ अव्वल; सलग नवव्या वर्षी केंद्रात प्रथम येण्याचा मान

न्याहळोद

धुळे (प्रतिनिधी संजय महाजन)  धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील महात्मा ज्योतिबा फुले संचलित नूतन विद्यालयाने दहावीच्या निकालात आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यंदाच्या परीक्षेत शाळेचा निकाल ९४.११ टक्के लागला असून, न्याहळोद केंद्रातील पहिले तिन्ही क्रमांक याच शाळेच्या विद्यार्थ्यांनी पटकावून आपला दबदबा सिद्ध केला आहे. विशेष म्हणजे, सलग नवव्या वर्षी केंद्रात प्रथम येण्याचा बहुमान नूतन विद्यालयाने मिळविला आहे.

 

न्याहळोद केंद्रात प्रथम: कु. पूनम संदीप महाजन (८९ टक्के), द्वितीय: कु. प्रतीक्षा सुरेश झाल्टे (८८.४० टक्के), तृतीय: कु. वैभवी राकेश जिरे (८८ टक्के) या प्रथम तीन क्रमांकावर शाळेच्या विद्यार्थिनींनीच मोहोर उमटवली आहे

सलग नऊ वर्षे केंद्रात अव्वल राहण्याचा विक्रम प्रस्थापित केल्याने न्याहळोद परिसरात विद्यालयाचे मोठे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपभाऊ उपाध्ये, माजी उपसरपंच देविदास जिरे, उपाध्यक्ष भास्कर माळी, विजू आप्पा पवार, रमेश जैन, राजाराम सैंदाणे, कैलास पाटील, चांदखा पठाण, अमृत पवार यांनी आनंद व्यक्त केला आहे.

शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here