जळगाव (संपादक सुनिल पाटील) । सध्या संपूर्ण राज्यात आणि जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा प्रचंड वाढला असून नागरिक उन्हाच्या कडाक्याने हैराण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जळगाव शहरातील पांडे चौक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर भव्य आणि थंडगार पाणपोई सुरू करण्यात आली आहे. या पाणपोईचे लोकार्पण राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.
हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने व पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा लोकउपयोगी उपक्रम राबविण्यात आला. शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची आणि प्रवाशांची तहान भागावी, हा या सामाजिक उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या उद्घाटन प्रसंगी विधानसभा क्षेत्र प्रमुख श्यामभाऊ कोगटा, महानगर प्रमुख संतोषभाऊ पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा युवासेना नेते जितेंद्र गवळी, महानगर समन्वयक राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, दीपक पाटील, विशाल निकम, दीपक माळी, शुभम गवळी, सचिन सोनार, राहुल सांगिले, चेतन परदेशी, क्रिश सनकत, विजय वाघ, शंतनू नारखेडे, यश कोल्हे, मानस तळले यांसह अनेक शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र गवळी मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले. शिवसेनेच्या या जनहितार्थ उपक्रमाचे जळगाव शहरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.







