कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ११ जणांना अटक, १.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांचा छापा

कोल्हापूर (प्रतिनिधी रहीम पिंजारी) । शहरातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे. ‘शिख गल्ली’ परिसरातील एका भाड्याच्या घरात सुरू असलेल्या या कारवाईत पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले असून, एकूण १ लाख ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, विचारेमाळ येथील शिख गल्लीत एका भाड्याच्या खोलीत काही लोक बेकायदेशीरपणे ‘तीन पानी’ जुगार खेळत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शाहूपुरी पोलिसांनी १६ मे २०२६ रोजी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला.

या कारवाईत पोलिसांनी नियाज दावन इनामदार (३६, रा. साळुंखेनगर), सागर मारुती कागले (२९, रा. सदर बाजार), पोपट वसंत हेगडे (४२, रा. कसबा बावडा), उमर उर्फ बंडा अय्याज फकीर (३२, रा. शिख गल्ली) – ज्याने जुगारासाठी जागा उपलब्ध करून दिली, अमित दिलीप वडणकर (४५, रा. शाहू मार्केट यार्ड), महेश रामचंद्र लोखंडे (४५, रा. गडमुडशिंगी), मुनाफ आयुब बागवान (२७, रा. बिंदू चौक), मंगेश चंद्रकांत पाटील (३८, रा. राजारामपुरी), संदीप मारुती वायदंडे (३९, रा. कनाननगर), राजेंद्र सदाशिव निकम (६४, रा. शिवाजी पेठ), सोहेल अस्लम शेख (२३, रा. राजारामपुरी) या ११ आरोपींना अटक केली आहे

पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम: ६१,२०० रुपये, मोबाईल संच: ८४,००० रुपये किमतीचे विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण १,४५,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल महेश सदानंद पाटील यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कारवाईमध्ये संतोष डोके पोलीस निरीक्षक, आकाश जाधव  पोलीस उपनिरीक्षक, सागर गुणवरे पोलीस उपनिरीक्षक, महेश पाटील, सुशील गायकवाड, रवी आंबेकर,  कृष्णा पाटील, अमोल पाटील, गौरव शिंदे, प्रशांत आवळे, सुशील सावंत, सुरज आबिटकर, अरुण कारंडे, युवराज सूर्यवंशी यांचा सहभाग होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here