सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | मंगळवेढा तालुका ग्राम विकासाला अधिक गतिमान करण्यासाठी महाराष्ट्र विकास सेवेतील कार्यक्षम अधिकारी श्री. योगेश कांबळे यांनी सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी मंगळवेढा पंचायत समितीच्या सहाय्यक गट विकास अधिकारी पदाचा पदभार अधिकृतपणे स्वीकारला. त्यांच्या या नियुक्तीबद्दल तालुक्यातून आनंद व्यक्त होत असून, पंचायत समितीच्या वतीने त्यांचा शानदार स्वागत व सत्कार सोहळा संपन्न झाला.
नवनियुक्त सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. योगेश कांबळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, मंगळवेढा पंचायत समितीच्या वतीने आणि तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा पारंपरिक पद्धतीने डोक्यावर टोपी, शाल आणि पुष्पहार देऊन अत्यंत उत्साहात जंगी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तालुक्यातील प्रशासकीय, सामाजिक, कायदेविषयक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. यामध्ये विलास मस्के (सेवानिवृत्त शाखा अभियंता), राहुल मस्के (पत्रकार तथा क्राईम रिपोर्टर, ‘बुलंद पोलीस टाइम्स’ महाराष्ट्र), संतोष मस्के (कायदेतज्ज्ञ/वकील) आदी उपस्थित होते. योगेश कांबळे यांच्या स्वागतासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचायत समितीतील सर्व विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने एकवटला होता. यावेळी रामलिंग सर्वदे (कनिष्ठ प्रशासन अधिकारी), श्री. नलावडे (विस्तार अधिकारी, पंचायत), महेश कुलकर्णी (वरिष्ठ सहाय्यक), कविता भानवसे (वरिष्ठ सहाय्यक), नंदकुमार स्वामी, ज्ञानेश्वर केंगार, प्रशांत ढगे, दामाजी पवार, अशोक पाटील, लिगाडे भाऊसाहेब आदींसह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
पदभार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना श्री. योगेश कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, “मंगळवेढा तालुक्याचा ग्रामविकास अधिक गतिमान करणे, सर्व शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवणे आणि लोकप्रतिनिधी, नागरिक व कर्मचारी यांच्यात सुयोग्य समन्वय राखून तालुक्याचा नावलौकिक वाढवणे, हाच माझा मुख्य संकल्प आणि उद्देश राहील.”
योगेश कांबळे यांच्या रूपाने एक अभ्यासू अधिकारी तालुक्याला मिळाल्याने मंगळवेढा पंचायत समितीच्या कामकाजाला एक नवी ऊर्जा मिळणार असून, तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.







