अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्रातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर

काँग्रेस

जळगाव ग्रामीण पूर्वच्या अध्यक्षपदी धनंजय चौधरी, तर पश्चिमच्या अध्यक्षपदी अविनाश भालेराव

जळगाव (संपादक सुनिल पाटील) | काँग्रेस पक्षाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियाना’तर्गत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या  निरीक्षकांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचा प्रत्यक्ष दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी सखोल चर्चा करून निरीक्षकांनी एक अहवाल हायकमांडकडे सादर केला होता.

या प्राप्त अहवालाला काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मान्यता दिली असून, राज्यातील विविध जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या अधिकृत नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे सरसरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या नव्या निवडींमध्ये जळगाव जिल्ह्याला विशेष प्रतिनिधित्व मिळाले असून, जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण पूर्वच्या अध्यक्षपदी धनंजय शिरीष चौधरी यांची, तर ग्रामीण पश्चिमच्या अध्यक्षपदी अविनाश भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही निवडींमुळे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जळगावसोबतच राज्यातील इतर महत्त्वाच्या शहरांच्या व जिल्ह्यांच्या अध्यक्षांची घोषणा करण्यात आली आहे, ती खालीलप्रमाणे:

  • जालना: डॉ. विशाल धानुके (शहराध्यक्ष), कल्याण दळवी (जिल्हाध्यक्ष ग्रामीण)
  • नाशिक: निलेश अर्जुन खैरे उर्फ बबलू खैरे (शहराध्यक्ष), रमेश जमरु कवांडोळे (ग्रामीण उत्तर), भारत शंकर ताकेकर (ग्रामीण दक्षिण)
  • पुणे शहर: प्रशांत जगताप (पुणे शहर पूर्व), सुश्री दीप्ती चौधरी (पुणे शहर पश्चिम)
  • नागपूर शहर: प्रफुल्ल विनोदराव गुदधे
  • कोल्हापूर: प्रवीण एल. केसरकर (शहराध्यक्ष), सतेज ऊर्फ बंटी पाटील (जिल्हाध्यक्ष ग्रामीण)
  • लातूर: डॉ. शिवाजी नरसिंगराव जावडेकर (शहराध्यक्ष), अभय साळुंके (जिल्हाध्यक्ष ग्रामीण)
  • नांदेड: अब्दुल गफार (शहराध्यक्ष), डॉ. विठ्ठल गंगाधरराव पावडे (ग्रामीण उत्तर), रवींद्र वसंतराव चव्हाण (ग्रामीण दक्षिण)
  • परभणी: रविराज अशोकराव देशमुख (शहराध्यक्ष), अब्दुल्ला खान दुर्रानी उर्फ बाबाजानी (जिल्हाध्यक्ष ग्रामीण)
  • नवी मुंबई व पनवेल: रामचंद्र धर्माजी दळवी (नवी मुंबई), डॉ. श्रुती शाम म्हात्रे (पनवेल शहर)
  • पिंपरी चिंचवड: नरेंद्र रामदास बनसोडे
  • कल्याण व मिरा भाईंदर: नवीन सिंग (कल्याण शहर), राकेश राजपुरोहित (मिरा भाईंदर शहर)
  • नंदुरबार: दीपक रामनभाई पटेल
  • पालघर: कॅप्टन सत्यम बी. ठाकूर

आगामी काळातील संघटनात्मक बांधणी आणि पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्षांच्या मंजुरीने या नियुक्त्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात नवनियुक्त अध्यक्षांचे स्वागत केले जात आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here