इंधन आणि गॅस दरवाढीविरोधात जळगावात काँग्रेस आक्रमक; भाजपा सरकारचा निषेध करत वाटल्या ‘मेलोडी’ चॉकलेट्स

काँग्रेस आक्रमक

जळगाव (संपादक सुनिल पाटील) । देशभरात सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस आणि सीएनजीच्या दरांविरोधात आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी, जळगाव शहर काँग्रेस आणि रावेर लोकसभा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. जळगाव शहरातील पांडे चौक येथील पेट्रोल पंपावर हे आगळेवेगळे आंदोलन पार पडले.

 

या आंदोलनादरम्यान भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी नागरिकांना व वाहनधारकांना ‘मेलोडी’ चॉकलेट्सचे वाटप केले. “मोदी सरकारचे अच्छे दिन म्हणजेच महागाई” असा टोला लगावत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि परिसर दणाणून सोडला.

पेट्रोल पंपावरील आंदोलनानंतर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून सरकारने त्वरित या दरवाढीवर नियंत्रण मिळवावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या संदर्भातील निषेधाचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले असून, हे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवावे अशी विनंती याप्रसंगी करण्यात आली.

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष धनंजय चौधरी, जळगाव महानगर अध्यक्ष जमीन शेख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील, प्रदेश सचिव मुफ्ती हारून नदवी, जळगाव शहर जिल्हाचे माजी अध्यक्ष शामकांत तायडे आणि माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील प्रामुख्याने सहभागी झाले होते.

याशिवाय नगरसेवक केतन किरंगे, युवक नेते मुक्तदीर देशमुख, माजी सरचिटणीस श्रीधर चौधरी, विजय वाणी, ॲड. अंकुश कटारे, युवक काँग्रेस अध्यक्ष मुजीब पटेल, मुक्तार शहा, प्रशांत सांगोरे, सर मानखुरे, नीलू शेठ चौधरी, प्रशांत पाटील, प्रदीप सोनवणे, झाकीर बागवान, राहुल भालेराव, जगदीश गाडे, अशोक खलाणे, मनोज वाणी, सुभाष पाटील, मीराताई सोनवणे, छायाताई कोरडे, अर्चनाताई गाडे, लीलाताई सोनवणे, भिकन अहिरे, समाधान पाटील, मालोजीराव पाटील, प्रतिभा विजय सोनवणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.काँग्रेस आक्रमक

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here