केंद्र सरकारने जळगाव जिल्ह्यात अधिकारी नियुक्त करावे – खासदार रक्षाताई खडसे

जळगाव – 10 जून रोजी वयोवृद्ध महिला कोविड रुग्णालयाच्या शौचालयात मृतावस्थेत सापडल्यामुळे जिल्हयात एक संतप्त भावना पसरली होती
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना 11 जून रोजी पत्र पाठवून जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात अवगत करून जळगाव जिल्हयात केंद्र सरकारचे निरीक्षण पथक पाठवून जळगाव जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घ्यावा आणि जळगाव जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने अधिकारी जळगाव जिल्ह्यात नियुक्ती करावे अशी विनंती केलेली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाच्या सचिव श्रीमती प्रीती सुदान यांच्याकडून मी दररोज फॉलोअप घेत आहे. अशी माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here