पिंपरीच्या जय हिंद कॉलेजचे प्रा. धनंजय ठोके यांना ‘मराठी’ विषयात पीएचडी पदवी प्रदान

धनंजय ठोके

‘नव्वदोत्तरी दलित नाटक व दलित रंगभूमी’
विषयावर १० वर्षे केले संशोधन

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | येथील जय हिंद ज्युनियर कॉलेजचे शिक्षक प्रा. धनंजय शिवचंद ठोके यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने मराठी विषयात अत्यंत मानाची ‘पीएचडी’ (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी ‘नव्वदोत्तरी दलित नाटक व दलित रंगभूमी’ या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या विषयावर आपला शोधप्रबंध सादर केला होता. त्यांच्या या यशाबद्दल शैक्षणिक, साहित्यिक तसेच सामाजिक स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 

प्रा. धनंजय ठोके यांचे उच्च शिक्षण (एम.ए., बी.एड., एम.एड., एम.फिल. आणि नेट) मराठी विषयातून झाले असून, त्यांनी पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागातून आपले संशोधन कार्य पूर्ण केले. यासाठी त्यांना डॉ. संभाजी मलघे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

विशेष म्हणजे, हा शोधप्रबंध पूर्ण करण्यासाठी त्यांना तब्बल १० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागला. पीएचडी प्रवेश झाल्यानंतर काही महिन्यांतच संपूर्ण जगावर कोव्हिडचे मोठे संकट ओढवले होते. या अत्यंत आव्हानात्मक आणि कठीण काळात संशोधन पुढे सुरू ठेवणे हे प्रा. ठोके यांच्यासमोर मोठे आव्हान होते. मात्र, विविध ग्रंथालयांची मदत, मार्गदर्शकांचे सहकार्य आणि मित्रपरिवाराची साथ यांच्या बळावर त्यांनी या संकटावर यशस्वी मात केली आणि आपले संशोधन पूर्णत्वास नेले.

प्रा. ठोके यांनी एका बाजूला जय हिंद कॉलेजमध्ये अध्यापनाचे कर्तव्य चोख बजावत असताना, दुसरीकडे आपल्या संशोधनाचा दर्जा कुठेही कमी होऊ दिला नाही. ‘कामाच्या ठिकाणी काम आणि अभ्यासाच्या ठिकाणी अभ्यास’ अशी पक्की मध्यरेषा आखून त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. यादरम्यान आलेला कामाचा ताण आणि धावपळ या सर्वांचा सकारात्मक स्वीकार करत त्यांनी संशोधनाचा टप्पा गाठला. भविष्यात या शोधप्रबंधावर आधारित एक अभ्यासपूर्ण पुस्तक लिहिण्याचा मानसही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपले प्रेरणास्थान असल्याचे प्रा. ठोके यांनी सांगितले. तसेच आपल्या या यशाचे श्रेय त्यांनी मार्गदर्शक डॉ. संभाजी मलघे, सहकारी शिक्षक, मित्र आणि कुटुंबाला दिले आहे.

“वडील शिवचंद ठोके, आई छाया ठोके, भाऊ प्रवीण, वहिनी प्रतिभा, बहीण स्वाती शिरसाट, वैशाली गायकवाड, लिंबाजी गायकवाड, प्रभावती बनसोडे, तसेच सासरे डॉ. शांताराम वाघ, सासू पद्मा वाघ, मेहुणे आनंद वाघ, मित्र अमित डोळस, रोहन सोनाळे, योगेश कांबळे, आणि प्रामुख्याने पत्नी अंतिमा व मुलगा अधिराज यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच मी हे संशोधन कार्य यशस्वीपणे पूर्ण करू शकलो,” अशा भावना प्रा. धनंजय ठोके यांनी पदवी मिळाल्यानंतर व्यक्त केल्या.धनंजय ठोके

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here