बार्शी पोलिसांची धडक कारवाई; कोल्ड्रिंक्स गोडाऊनमधील चोरीचा अवघ्या ४ दिवसांत छडा; दोन आरोपी गजाआड

बार्शी

सोलापूर (महाराष्ट्र राज्य क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) | बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका गोडाऊनमध्ये झालेल्या चोरीचा अत्यंत कौशल्याने अवघ्या चार दिवसांत छडा लावला आहे. सुभाष नगर परिसरातील एका गोडाऊनमधून ‘स्टिंग कोल्ड्रिंक्स’चे बॉक्स चोरणाऱ्या अनिकेत राजू केंगार आणि किरण मारुती पोठे (दोघे रा. पंकज नगर, बार्शी)  या दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून ६१ बॉक्स जप्त करण्यात आले आहेत.

३१ मे २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी संदीप राजेश जगताप (रा. सुभाष नगर, बार्शी) यांच्या मालकीच्या गोडाऊनमधून अज्ञात चोरांनी ८२ ‘स्टिंग कोल्ड्रिंक्स’चे बॉक्स चोरून नेले होते. या चोरीप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३६/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३४ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला तपासाचे आदेश दिले. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ आणि परिसरातील सी.सी.टी.व्ही. (CCTV) फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी संशयास्पद हालचालींवरून ५ जून २०२६ रोजी अनिकेत केंगार आणि किरण पोठे यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेल्या मालापैकी ६१ बॉक्स यशस्वीरीत्या हस्तगत केले आहेत. या गुन्ह्याचा पुढील कायदेशीर तपास पोलीस कॉन्स्टेबल बहिरे करत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अभय माकणे, पोहेकॉ. माने (बक नं. १६६७), पोहेकॉ. साठे (बक नं. ४८८), पोकॉ. बहिरे (बक नं. ५९५), पोकॉ. बाळकृष्ण मुठाळ (बक नं. ९९६), पोकॉ. राहुल उदार (बक नं. २००), पोकॉ. पवार (बक नं. ७८७), पोकॉ. नितनात (बक नं. १९९५), पोकॉ. जाधव (बक नं. २१११), पोकॉ. देशमुख (बक नं. १९७४), पोकॉ. राऊत (बक नं. १५३), पोकॉ. शेख (बक नं. १८६०), पोकॉ. उघडे (बक नं. १५०४), पोकॉ. जाधवर (बक नं. ९४८), पोकॉ. अकुलवार (बक नं. २०२१), पोकॉ. सोमवाड (बक नं. १९९८), पोकॉ. भांगे (बक नं. ९१८) आणि पोकॉ. माळी (बक नं. ९८) यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here