भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – कुऱ्हा पानाचे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथे आज कोरोना चाचणी तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. आज दि २५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात कुऱ्हा ग्रामीण रुग्णालयाचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. प्रिया बोंबटकार यांनी ५ रॅपिड अँटीजन टेस्ट घेतले. त्यात २ व्यक्ती पॉझिटिव्ह आले त्यांना लगेच पुढील उपचारासाठी भुसावळ येथे पाठवण्यात आले आहे. आणि २१ RTPCR चाचणी घेण्यात आली व त्याचे निकाल दि.२७/०८/२०२० रोजी येतील अशी माहिती डॉ. बोंबटकार मॅडम यांनी दिली.
या प्रसंगी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रिया बोंबटकार यांच्यासह आरोग्य सहाययक एस. एन . माळी ,आरोग्य सेविका सोनवणे ,आरोग्य सेवक आर.बी. अटवाल, आरोग्य सहाययक डॉ .एस. एन. माळी, डॉ. उमेश बडगुजर व गावातील आशा सेविका यांची उपस्थिती होती.








