पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रीबॉर्न वूमन केअर क्लिनिक अँड इंटिग्रेटेड फर्टिलिटी सेंटर’चे भव्य उद्घाटन; ‘मातृत्व संजीवनी अभियान’चा शुभारंभ

रीबॉर्न वूमन केअर क्लिनिक

पुणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर रोहन सोनाळे) | राष्ट्रीय डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात ‘रीबॉर्न वूमन केअर क्लिनिक अँड इंटिग्रेटेड फर्टिलिटी सेंटर’ या अत्याधुनिक, आयुर्वेद-आधारित महिला आरोग्य व वंध्यत्व उपचार केंद्राचे भव्य उद्घाटन १ जुलै २०२६ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. श्री. रवीभाऊ लांडगे यांच्या शुभहस्ते पार पडले.

या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून भाजप शहराध्यक्ष मा. श्री. शत्रुघ्न काटे, नगरसेवक मा. श्री. राहुल कलाटे, भाजप उपाध्यक्ष मा. श्री. राम वाकडकर, नगरसेविका मा. सौ. आरती चोंधे, नगरसेविका मा. सौ. श्रुती वाकडकर, नगरसेवक मा. श्री. धर्मपाल तंतरपाळे तसेच नगरसेवक मा. श्री. राहुल दादा जाधव प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या निवडक डॉक्टरांचा “डॉक्टर्स गौरव सोहळा” आयोजित करण्यात आला होता. वैद्यकीय क्षेत्रात उत्कृष्ट आणि समर्पित योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे “मातृत्व संजीवनी अभियान” या विशेष जनजागृती अभियानाचा शुभारंभ. या अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर व्यापक जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने वंध्यत्व व गर्भधारणेपूर्व आरोग्य संवर्धन, पीसीओडी (PCOD) / पीसीओएस (PCOS) व्यवस्थापन, मासिक पाळीतील विविध विकार, गर्भधारणेपूर्वीचे आणि गर्भावस्थेतील आयुर्वेदीय मार्गदर्शन, प्रसूतीनंतरचे (Post-pregnancy) आरोग्य आणि काळजी, संप्रेरक (Hormonal) असंतुलन आणि त्यावरील उपाय, बदलत्या जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांचे प्रतिबंध व व्यवस्थापन, आयुर्वेद, पंचकर्म व समन्वित उपचारपद्धतीद्वारे महिलांचे सर्वांगीण आरोग्य या विषयांचा समावे होता.रीबॉर्न वूमन केअर क्लिनिक

‘रीबॉर्न वूमन केअर क्लिनिक अँड इंटिग्रेटेड फर्टिलिटी सेंटर’ हे आधुनिक वैद्यकीय निदानासोबतच आयुर्वेदातील शास्त्रोक्त उपचारपद्धतींचा समन्वय साधणारे पिंपरी-चिंचवडमधील एक विशेष केंद्र ठरत आहे. या केंद्रात स्त्रीरोग, वंध्यत्व, पीसीओडी, संप्रेरक विकार, गर्भधारणेची पूर्वतयारी, आयव्हीएफपूर्व (Pre-IVF) व आयव्हीएफनंतरची (Post-IVF) आयुर्वेदीय साथ, पंचकर्म तसेच जीवनशैली व्यवस्थापन यांसारख्या अत्याधुनिक सेवा महिलांसाठी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

उद्घाटन प्रसंगी बोलताना मान्यवरांनी स्पष्ट केले की, आजच्या धावपळीच्या युगात महिलांच्या आरोग्याबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या समर्पित केंद्रांची अत्यंत गरज आहे. आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद यांचा सुवर्णमध्य साधून महिलांना गुणवत्तापूर्ण, नैतिक व परिणामकारक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा ‘रीबॉर्न’चा हा संकल्प अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. कार्यक्रमाची सांगता उपस्थित मान्यवर, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, नागरिक व हितचिंतकांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here