विश्वकर्मावंशीय समाज संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार व नियुक्तीपत्र वाटप सोहळा उत्साहात संपन्न

विश्वकर्मावंशीय

जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | विश्वकर्मावंशीय समाज संघटनेच्या वतीने नुकतीच एक महत्त्वाची बैठक अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना राज्य उपाध्यक्ष श्री. भगवानभाऊ वाघ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

 

या प्रसंगी जळगाव जिल्हा कार्यकारणी, जळगाव शहर कार्यकारणी तसेच युवा कार्यकारणीची अधिकृत घोषणा करण्यात आली. समाजातील नव्या चेहऱ्यांना संधी देऊन संघटन अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने आयोजित या बैठकीला पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपस्थितांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी, समाज बांधवांनी एकत्र येऊन संघटनेच्या आगामी सामाजिक उपक्रमांवर चर्चा केली आणि हा सत्कार सोहळा अत्यंत आनंदी वातावरणात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here