जळगाव (संपादक सुनिल पाटील) : जिल्हा काँग्रेस कमिटीची नूतन कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक आज दिनांक 11 रोजी काँग्रेस भवन येथे संपन्न झाली बैठकीत जिल्ह्यात पक्ष संघटना त्याचबरोबर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच जिल्हा बँक निवडणूक यासंदर्भात चर्चा झाली
यावेळी नूतन तालुका अध्यक्ष यांना जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण वाईज कमिट्या तयार करणे त्याच बरोबर बूथ कमिट्या तयार करणे संदर्भात चर्चा करण्यात आली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस मुफ्ती हारून नदवी अ.भा.का. सेवादलचे राष्ट्रीय सचिव विनोद कोळपकर प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे जिल्हा बँक संचालक डॉक्टर सुरेश शामराव पाटील ज्येष्ठ नेते श्रीधर विष्णू चौधरी मुनव्वर खान माजी सभापती सुरेश बापू पाटील ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष विजय महाजन पाचोरा माजी प. स सभापती शेख इस्माईल शेख फकिरा जिल्हा उपाध्यक्ष मंगेश अग्रवाल सुभाष पवार विजय कुमार कोसोदे माजी उपनगराध्यक्ष अरुणाताई कनखरे पिरण अनुष्ठान यांची उपस्थिती होती यावेळी जिल्ह्यातून. प्रदेश प्रदेश स्तरावर ज्यांची निवड झाली असे विजय महाजन राहुल मोरे किरण महाजन कौस्तुभ पाटील अँड अंकुश कटारे याचा सत्कार करण्यात आला
यावेळी बैठकीत चाळीसगाव तालुका अध्यक्ष एडवोकेट वाडीलाल चव्हाण भडगाव शहराध्यक्ष मिसा पारोळा अध्यक्ष प्रा संजय पाटील चाळीसगाव शहराध्यक्ष प्रा नितीन राजपूत एरंडोल तालुका अध्यक्ष सुनील पाटील रहीम कुरेशी धरणगावचे सुनील सोनार यांनी आपले पक्ष संघटने संदर्भत विचार मांडले त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने मान्यता दिलेल्या जिल्हा काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले
बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सरचिटणीस बाबा देशमुख यांनी केलं तर आभार प्रदीप सोनावणे यांनी मांनले बैठकीस जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते त्यात नंदकुमार सोनार, मुक्तार शाह नितीन सूर्यवंशी, राजू भोसले राजेंद्र पाटील, दिनेश पवार, नितीन परदेशी, संजय बदाने सागर पाटील, प्रताप आबा पाटील, शेख शकील शेख इब्राहिम, जाकिर बागवान, छाया कोरडे, अर्चना गाडे, दीपक सोनवणे लिलाबाई सोनवणे, राहुल भालेराव, प्रताप पाटील भगवान रणदिवे यांची उपस्थिती होती







