भुसावळ : खुनातील आरोपीना बाजारपेठ पोलिसांकडून काही तासातच अटक

भुसावळ (प्रतिनिधी गिरीश पवार) – दिनांक.25.08.2020 रोजी रात्री 10.00 वाजेच्या सुमारास जुन्या वादातून विलास दिनकर चौधरी (वय-32) घराबाहेर सिमेंटच्या पाईपवर मोबाईलवर खेळत असतांना आरोपींनी उजव्या हाताच्या कोपराजवळ व मनगटावर डाव्या हाताच्या दंडावर गंभीर जखमा करुन पिस्टलमधून एक गोळी फायर करुन हत्या करण्यात आली होती. याबाबत बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना पोलिसांनी शिताफीने सापळा रचून अटक केली.
बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पो. कॉ विकास सातदिवे यांना गुप्त खबऱ्यांनी हे आरोपी मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक खबर दिल्यांनंतर सापळा रचून त्यांना वांजोळा रोड भागातून अटक करण्यात आली . अक्षय न्हावकर ( रा – चक्रधर नगर ), आकाश पाटील ( नारायनानगर ) आणि अभिषेक शर्मा ( चमेली नगर ) अशी या आरोपींची नवे आहेत . त्यांना काल सकाळी सहा वाजता अटक करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती भाग्यश्री नवटके तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे, पोहेकॉ 626 सुनिल बारकु जोशी, पोना रमन काशीनाथ सुरळकर, किशोर महाजन, समाधान पाटील, रविंद्र बि-हाडे, महेश चौधरी, पोकॉ विकास मारोती सातदिवे, प्रशांत परेदशी, कृष्णा देशमुख व वाहन चालक पोहेकॉ अयाज खान या बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here