खापर येथील अतिदुर्गम भागात जि. प. शिक्षक देतायेत ऑनलाईन शिक्षणाचे धडे

अक्कलकुवा (प्रतिनिधी) – सातपुडा पर्वत रांगेतील अतिदुर्गम अक्कलकुवा तालुक्यातील खापर केंद्रातील जि प शाळा उदेपूर (खालचे) ता .अक्कलकुवा जि नंदूरबार येथील मुख्याध्यापक मोगीलाल चौधरी यांनी विद्यार्थ्यांसाठी बागेतील शाळा हा उपक्रम सुरू केला आहे. आठवड्यातुन दोन दिवस शाळेतील शिक्षक मोगीलाल चौधरी व त्यांचे सहकारी जोलमा वसावे बागेतील शाळा उपक्रम घेत आहेत,
कोरोनामुळे शाळा बंद आहेत, अश्या वेळी ऑनलाइन पध्दतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करावे असे शासना मार्फत मार्गदर्शक सूचना आहेत ऑनलाइन अध्यापन करताना अक्कलकुवा सारख्या दुर्गम तालुक्यात अनेक अडचणी आहेत, या भागातील गरीब,सामान्य परिस्थितीत जीवन जगणाऱ्या आदिवासी समाज बांधवांकडे स्मार्टफोन नाहीत, तशातच ज्या दोन-चार पालकांकडे स्मार्टफोन आहेत त्यांच्याकडे बॅलन्स नसतो, सर्वात महत्वाची बाब म्हणजे मोबाईल नेटवर्क नसते अश्या अनेक अडचणी आहेत, अश्या वेळी व्हाट्सपवर किंवा ऑनलाइन अध्यापन करताना शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते,त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने अध्यापन करणे शक्य नाही ही गोष्ट उदेपूर शाळेचे मुख्याध्यापक मोगीलाल चौधरी यांचा लक्षात आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी उदेपूर व परिसरात कोरोना हा आजार नसल्याची खात्री करून
उदेपूर शाळेतील उपक्रमशील शिक्षक गावातील परिस्थिती तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याची खात्री करून विद्यार्थ्यांना अध्यापन करीत आहेत.
सदर उपक्रम घेताना शासनाने कोरोना काळात ठरवलेल्या सर्व नियमांचे पालन केले जाते उपस्थित सर्व विद्यार्थ्यांचे सॅनिटाइझरने हात स्वच्छ धुऊन विद्यार्थ्यांना मास्क दिले. जाते,विद्यार्थ्यांना एकमेकांपासून लांब बसवून अध्यापन केले जाते,कुणी आजारी नाही, याची खात्री केली जाते,उघड्यावर मोकळ्या जागेत वर्ग भरवल्याने वातावरणात ताजेपणा व विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्यात झाडाखाली शांतिनिकेतन प्रमाणे शिक्षण दिल्यास विद्यार्थ्यांचा शिक्षणात उत्साह वाढतो,याची कल्पना घेऊन मोगीलाल चौधरी यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे सहकार्य घेऊन शालेय परिसरात सुंदर बाग तयार केली आहे, याच बागेत अध्यापनाचा सदर उपक्रम ऑगस्ट महिन्यात सुरू केला आहे. विद्यार्थ्यांना एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवण्याबाबत विशेष दक्षता घेऊन आठवड्यातुन दोन दिवस 2 तास अध्यापन केले जाते.
मार्च महिन्यापासून कोरोनाचा आपल्या देशात प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात होताच शासनाने विद्यार्थ्यांचा सुरक्षिततेसाठी शाळांना सुट्या जाहीर केल्या,आजतागायत कोरोना कमी झालेला नाही उलट रोजची आकडेवारी चिंताजनक आहे, अश्या वेळेस शासन सर्वत्र शाळा सुरू करण्याबाबत आदेश देत नाही, परंतु ऑनलाईन पध्दतीने अध्यापन करावे याबाबत मार्गदर्शक सूचना आहेत, शाळा बंद आहे परंतु विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे, शाळा कधी सुरू होतील याबाबत निश्चित सांगता येत नाही,पालकांचे शैक्षणिक ग्रुप बनवून शाळेतील विद्यार्थ्यांना सर्व सरकारी व खाजगी शाळेतील शिक्षक अध्यापन करीत आहेत, परंतु अक्कलकुवा सारख्या दुर्गम भागातील समस्या वेगळ्या असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी उपक्रमशील शिक्षक मोगीलाल चौधरी यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून परिस्थितीचा अंदाज घेऊन उदेपूर (खा)येथे बागेतील शाळा उपक्रम सुरू आहे.
त्यांचा या उपक्रमात गावातील पालक,क्षेत्रीय अधिकारी केंद्रप्रमुख अनिल वानखेडे, खापर बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी एस.एफ.ठाकरे,गटशिक्षणाधिकारी मा. देसले साहेब,परिसरातील मोठे गाव खापर येथील विविध सामाजिक संघटना व संस्था यांनी सदर शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here