पुणे (प्रतिनिधी पंढरी गायकवाड) – विश्रांतवाडी, पुणे – महाराष्ट्रात रुग्ण हक्क परिषदेच्या शेकडो शाखा आहेत. राज्यातील पहिली शाखा विश्रांतवाडी, दुसरी शाखा कळस येथे तर तिसरी शाखा धानोरीत स्थापन झाली. एकापाठोपाठ एक सलग तीन शाखा स्थापन झालेल्या पुण्यातील या शाखा ऐतिहासिक आहेत. धानोरीतील शाखेने एका पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये नवजात बाळावर अकरा लाख रुपयांची शत्रक्रिया मोफत करून त्याला जीवदान दिले होते. यानंतर हजारो नागरिक धानोरी येथील रुग्ण हक्क परिषदेच्या शाखेशी एकरूप झाले. भैरवनगर येथील पेट्रोल पंपासमोर असलेला शाखेचा लोखंडी बोर्ड येथील मद्यविक्रेत्या दुकानदार आणि त्याचा साळुंखे नावाच्या साथीदाराने चोरून नेल्याचे नागरिकांनी लक्षात आणून दिले. या बोर्डाचे नूतनीकरण १५ ऑगस्ट २०२० रोजी पार पडले होते. मात्र आमच्या भावना तीव्र असून आम्ही चोरीप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे, आता या मद्यविक्रेत्या दुकानासमोर तीव्र आंदोलन करणार असल्याचे रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहर अध्यक्षा मनीषा तिखे म्हणाल्या.
लॉकडाऊन असताना मागच्या दाराने डुप्लिकेट दारू विकून प्रतिष्ठा निर्माण करणाऱ्या, दहशत आणि गुंडगिरी करणाऱ्या आणि आमचे पवित्र काम बंद व्हावे म्हणून मानसिक त्रास देण्याऱ्या, गुन्हेगारी स्वरूपातुन लोखंडी बोर्डाची चोरी करणाऱ्याना आम्ही आमची ताकद दाखवून देऊ.
मटका, जुगार, गांजा – दारू अश्या दोन नंबरच्या धंदे करणाऱ्यांनी, काळे धंदे करणाऱ्यांनी आपल्या लायकीत रहावे अन्यथा जनतेची ताकद काय असते हे दाखवून देऊ. आमच्या धानोरी भैरवनगर येथील शाखेजवळील दारूविक्रेता आणि त्याचा साथीदार साळुंखे यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या नादी लागून घोडचूक केली आहे. डुप्लिकेट दारू विक्रेत्याची संपत्तीची चौकशी व्हावी, परवान्यांचे चौकशी व्हावी, बनावट दारूचे नमुने तपासून – आरोग्यास हानिकारक असल्यास तातडीने अटक व्हावी, बोर्डचोरी प्रकरणी पोलिसांनी अटक करावी यामागणीसाठी रुग्ण हक्क परिषद मोठ्या संख्येने आंदोलन करेल. असेही शहराध्यक्ष मनीषा तिखे म्हणाल्या. पोलीस तक्रार करताना शहराध्यक्ष मनीषा तिखे, धानोरी शाखा अध्यक्ष मनोज बाराथे, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात हजर होते.
Home पश्चिम महाराष्ट्र पुणे धानोरीतील रुग्ण हक्क परिषदेचा नामफलक चोरीप्रकरणी तीव्र आंदोलन करणार – मनीषा तिखे







