वाशिम (प्रतिनिधी पंढरी गायकवाड) – शिरपूर जैन ग्राम पंचायत मधे दि. 25/8/2020 रोजी निव्रुत्त होत असलेल्या
सदस्यांचा सत्कार क्रांती पँनलचे अध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख अशोकभाऊ अंभोरे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री. अशोकराव अन्ना देशमुख हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बाळासाहेब देशमुख, विजय अंभोरे, गणेश अंभोरे, दिलीप विश्वंभर, शाम दीक्षित, दत्तराव भांदुर्गे, विशाल अंभोरे आदी उपस्थीत होते.
सत्कारमुर्ती गणेश अंभोरे, संजय भालेराव, संजय गौर, बाळुभाऊ वानखेडे, सौ. आशासंतोष भालेराव, बंसीभाऊ इंगळे, अहेमद मिर्झा यांचा यथोचित अशोकभाऊ अंभोरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याच बरोबर ग्राम पंचायतला वेळोवेळी मार्गदर्शन आणी सहकार्य करणारे अशोकअन्ना देशमुख, बाळासाहेब देशमुख, दिलीप विश्वंभर, शाम दीक्षित यांचा सुध्दा सत्कार करण्यात आला.
ग्रामपंचायत सर्व कर्मचाऱ्यांना सन्मान देऊन चांगली कामगिरी केल्या बद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले, कर्मचाऱ्यांनि सुद्धा यावेळी सरपंच, व सर्वांचे आभार मानले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शाम दीक्षित यांनी तर आभार प्रदर्शन विजय अंभोरे यांनी केले.
Home राज्य पश्चिम महाराष्ट्र ग्रामपंचायत शिरपूर सदस्यांचा क्रांती पॅनलच्या वतीने निरोप सत्कार समारंभ







