जळगाव (जिल्हा क्राइम रिपोर्टर प्रमोद रुले) | भारतीय जनता पार्टी जळगाव पश्चिम जिल्ह्यांतर्गत कासोदा मंडळ अल्पसंख्याक मोर्चाच्या अध्यक्षपदी सुबक्तगीन सलाउद्दीन शेख (रा. कासोदा, ता. एरंडोल) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप एरंडोल तालुकाध्यक्ष राजेंद्र विठ्ठल पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड जाहीर केली.
सदर नियुक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने तसेच गिरीश महाजन, रक्षा खडसे, संजय सावकारे, रवी अनासपुरे यांच्या मान्यतेनुसार करण्यात आली आहे. तसेच खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश (राजुमामा) भोळे, आमदार अमोल जावळे, आमदार मंगेश चव्हाण व जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
शेख यांनी आगामी काळात पक्षाचा जनाधार वाढवून अल्पसंख्याक घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल सुबक्तगीन शेख यांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.







