धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – एकशे सहा वर्षांची ज्ञानवंतांची परंपरा असलेल्या शतकमहोत्सवी पी.आर.हायस्कूलला अद्ययावत ग्रंथालय असून जुन्या काळातील अनेक विषयांवरची उत्तमोत्तम,दुर्मिळ आणि वाचनीय हजारो पुस्तकांचा खजिना या ग्रंथालयात आहे.सर्व प्रकारची वर्तमानपतत्रे आहेत.याच ग्रंथालयात विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र अभ्यासिका असून असंख्य विद्यार्थी अभ्यासासोबतच आपली आवडती ज्ञानवर्धक पुस्तके वाचून आपली वाचनतृष्णा भागवतात.या ग्रंथालयासाठी पूर्णवेळ ग्रंथपाल म्हणून श्री. विराग वाजपेयी हे काम पाहतात.त्यांनी हे ग्रंथालय अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त ठेवले आहे.
अशा संपन्न ग्रंथालयासाठी पुण्याच्या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशन संस्थेच्या वतीने देणगीदारांनी दिलेल्या देणगीतून अनिल अवचट ना. धों. महानोर, रत्नाकर मतकरी, डॉ. प्रकाश आमटे अशा ख्यातनाम लेखकांची अतिशय दर्जेदार आणि वाचनीय अशा २६ पुस्तकांचा संच मुख्याध्यापक एस. एम. अमृतकर, उपमुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे आणि पर्यवेक्षक आर. के. सपकाळे यांच्याकडे ग्रंथदान म्हणून देण्यात आला आहे.यासाठी शाळेचे शिक्षक सुरेंद्र प्रकाश सोनार सर यांनी सहकार्य केले.या ग्रंथदानाबद्दल शाळेने सातारा येथील देणगीदार जितेंद्र रासकर, मुंबई येथील देणगीदार निला पटवर्धन आणि युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशन यांचे आभार व्यक्त केले आहे.







