शहादा (विजय पाटील) – काल धुळे येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला. याविरोधात शहादा तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष शरद पाटील यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची धुळे येथे गाडी अडवून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्न मांडण्यासाठी आंदोलन केले असता पोलीस प्रशासनाकडून अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला.पालक मंत्री उपस्थित असताना त्यांच्यासमोर घडलेला सगळा प्रकार निषेधार्थ असून या घटनेची जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
कोरोना महामारी मुळे महाराष्ट्रात अनेकांची आर्थिक स्थिती खालावलेली असून विद्यार्थ्यांना त्यांची वार्षिक फी मध्ये सवलत मिळावी तसेच परीक्षेच्या निकालांचे पुनर्मूल्यांकन व्हावे व विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत मिळावे या मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा यांना देण्यात आलेले आहे.महाराष्ट्रातील एकूण परिस्थिती पाहता शिक्षणाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. चुकीच्या निकालांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे. तरी वरील मागण्यांचा सकारात्मक विचार झाला नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा शहादा तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
शरद पाटील अध्यक्ष शहादा तालुका भारतीय जनता युवा मोर्चा यांची प्रतिक्रिया.
https://www.facebook.com/108973650860466/videos/768437157331754/?t=0







