जळगाव जिल्ह्यात आज आढळले ७०८ कोरोनाबाधित

२५ हजारांचा आकडा पार तर ४२० रुग्णांनी दिवसभरात केली कोरोनावर मात

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात गुरुवारी कोरोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तब्बल ७०८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून जिल्ह्यात कोरोनाने २५ हजारांचा टप्पा पार केला आहे. एकूण रुग्णसंख्या २५ हजार ०९३ एवढी झाली आहे. आज आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक १४९ रुग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहे. आज दिवसभरात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४२० कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे.
काल (दि.२६) जिल्ह्यात विक्रमी ८५८ रुग्ण आढळून आले होते. दुसऱ्या दिवशीही कोरोनाचा कहर कायम राहत आज सातशेचा आकडा पार केला असून आज आढळलेल्या ७०८ कोरोनाबाधितांमध्ये जळगाव शहर १४९, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ ४२, अमळनेर ९२, चोपडा १००, पाचोरा ३०, भडगाव १३, धरणगाव ३८, यावल १३, जामनेर ४९, रावेर ३८, पारोळा ७८, चाळीसगाव २६, मुक्ताईनगर १८, बोदवड ५, इतर जिल्ह्यातील ५ असा समावेश आहे.. दिवसभरात १३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यात भुसावळ, चाळीसगाव, तालुक्यातील प्रत्येकी ३, रावेर तालुक्यातील २ तर जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, भडगाव, पाचोरा, मुक्ताईनगर तालुक्यात प्रत्येकी १ असल्याची माहिती शासकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागोराव चव्हाण यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here