क्वारंटाईन सेंटरमध्ये पोलिसाचा ह्रदयविकाराने मृत्यू

कोल्हापूर (नियाज जमादार) – शिरोली पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचाऱ्याचा घोडावत कोविड सेंटरमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.
शिरोली पोलिस ठाण्यातील कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी यांना काही दिवसांपूर्वी अशक्त वाटू लागल्याने त्यानी डॉक्टरांच्या सल्यानुसार घोडावत कोविड सेंटरमध्ये आपला स्वॅब तपासणी दिला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानतर त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू होते. बुधवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जेवन करून ते आपल्या रूममध्ये जाण्याअगोदर डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याविषयी चौकशी केली. आपली तब्येत बरी असल्याचे सांगून ते रूममध्ये गेले. त्याचवेळी त्यांना ह्रदयविकाराचा जोराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शिरोली पोलिस ठाण्यात शोककळा पसरली आहे.
घोडावत येथील डॉक्टर मदने यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, त्यांची आम्ही तपासणी केली होती. ते पॉझिटिव्ह जरी असले तरी त्यांना फारसी लक्षणे नव्हती. त्यांची प्रकृती चांगली होती. ते रात्री जेवन करुन खोलीत गेले आणि खाली कोसळले. आम्ही जाऊन तात्काळ उपचाराचे प्रयत्न केले. पण, त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here