विराट-अनुष्काने चाहत्यांना दिली गुड न्यूज

नवी दिल्ली – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी लवकरच पाळणा हालणार आहे. ही गुड न्यूज विराटने ट्विट करत चाहत्यांना दिली आहे.
विराटने ट्विटरवर अनुष्कासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. ”आणि मग, आम्ही तीन! जानेवारी 2021मध्ये आगमन होत आहे,” असे विराटने म्हटले आहे. फोटोत अनुष्का बेबी बंपसह दिसत आहे. विराट आणि अनुष्काचे ११ नोव्हेंबर २०१७ मध्ये लग्न झाले होते. आता २०२१ मध्ये दोघांच्या सुखी संसारात बाळाचे आगमन होणार आहे. विशेष म्हणजे विराट पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी यूएईमध्ये असणार आहे. त्यापूर्वी त्याने आपण बाबा होणार असल्याची माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here