जिम आणि मंदिरांविषयीची गुड न्यूज लवकरच मिळणार – संजय राऊत

मुंबई (हितेश मिस्त्री) – राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील मंदिर व जिम बंद आहेत. अनलॉकमध्ये अनेक गोष्टी सुरु करण्यात आल्या आहेत. जिम व मंदिर चालू करण्यासाठी राज्यातून मागणी होत आहे.
खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील जिम व मंदिरचा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय होऊ शकतो असे म्हटले आहे. एक सप्टेंबर पासून अनलॉक ४ ला सुरुवात होणार आहे. अनलॉक ४ मध्ये जिम व मंदिर उघडन्याचा निर्णय होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यात अजूनही जिल्हाबंदी कायम आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ई पास अनिवार्य आहे. त्यामुळे नागरिकांनी जिल्हाबंदीही उठवण्याची मागणी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here